शीतपेयांचं पाणी शेतीकडे वळणार!

राज्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शीतपेयासाठी देण्यात येणारं पाणी थांबवून हे शेतीसाठी देण्याकरता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवणार आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 7, 2013, 06:23 PM IST

www.24taas.com, मुंबई
राज्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शीतपेयासाठी देण्यात येणारं पाणी थांबवून हे शेतीसाठी देण्याकरता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवणार आहेत.
कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं हे विधान दुष्काळाच्या झळांनी होरपळणा-या जनतेला दिलासा देणारं म्हणावं लागेल... राज्याच्या अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती असल्याचं मान्य करत पिण्यासाठी पाणी मिळणं गरजेचं असल्याचंही कृषीमंत्र्यांनी मान्य केलंय.. शिवाय शेतक-यांसाठी पाणी मिळावं यासाठीही सरकारकडं पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
शेती आणि पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी अन्य अन्य योजनांवरच्या निधीत कपातीचे संकेतही त्यांनी दिले आहेत. जसजसा उन्हाळा जवळ येईल तसतसा पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे.. अशावेळी कृषीमंत्र्यांचं वक्तव्य दिलासादायक म्हणावं लागेल.