www.24taas.com, धुळे
दोन गटांत रविवारी संघ्याकाळी झालेल्या चकमकीमुळे धुळ्यात तणाव आहे. जमावानं दगड-विटांचा मारा केल्यामुळे अंदाजे १५५ जण जखमी झालेत. यातले ७ जण गंभीर असल्यचं सांगितलं जातंय. येथे संचारबंदी लागू करण्यात आलीय.
जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ४ जण ठार झालेत. यावेळी काही समाजकंटकांनी पोलिसांच्या दिशेनं दगडफेक केली. यात ४८ पोलीस कर्मचारी जखमी झालेत. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून आता धुळ्यात शांतता असल्याचं म्हटलंय.
दोन्ही गटांतील दंगलखोरांकडून एकमेकांवर, पोलिसांवर दगड, फरशी, विटा, असिडच्या बाटल्यांचा तुफान मारा झाला. दहशतीमुळे जीव वाचविण्यासाठी घरे सोडून पळणाऱ्या काही नागरिकांची घरे, दुकाने, इमारती दंगलखोरांकडून पेटविल्या गेल्या. त्यात पंधरावर ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने आग भडकली. वाहने, हातगाड्या, दुकानेही पेटविण्यात आली.