संजय पवार, सोलापूर : सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे पाटील यांचा दारूण पराभव केलाय.
कॉंग्रेस राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे सहज जिंकून येणे इतके संख्याबळ असतानाही हा विजय होणे म्हणजे राष्ट्रवादीला घराच्या मतदारांनीच चित केले असेच झाले आहे. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदार परिचारक यांच्या निवडून येण्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या भविष्यात मोठा वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचाच हात असावा अशी चर्चा सध्या सोलापूरच्या राजकारणात आहे.
अधिक वाचा - धुळे - नंदूरबारमध्ये अमरीश पटेल यांची बाजी
सोलापूर विधानपरिषद निवडणूकत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी आघाडी होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मतदारांची संख्या जवळपास २८७ अशी होती. सोलापूर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील बहुतेक नगपालिका आणि पंचायत समिती ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या ताब्यात आहेत. सोलापूर विधानपरिषद ही राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता उमेदवार निवडून येणे क्रम प्राप्त होते , मात्र कोणत्या गोष्टीचे वजन जास्त झाले हे कळलेच नाही आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीची हक्काची जागा भाजप पुरस्कृत उमेदवाराने हिसकावू नेली.
अधिक वाचा - मुंबई विधानपरिषदेच्या जागांवर कदम आणि जगताप!
अधिक वाचा - कोल्हापुरातून सतेज पाटील विजयी; बंडखोर महाडिकांना धोबीपछाड
सोलापूर महानगर पलिअक आणि अक्कलकोट या मतदार संघात कॉंग्रेस राष्ट्रवादी जवळपास १३४ मतदान आहे. कॉंग्रेस येथे आघाडीवर असताना राष्ट्रवादीचा उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हक्काची मते प्रशांत परिचारकला मिळाली. एकूण हा निकाल अपेक्षित होता, असे सांगून भाजपने चांगलीच मोठ बांधल्याचं समोर आलंय.