जळगाव : सुन, लेकीचे डोहाळे पुरवल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे. मात्र जळगावमधल्या सपकाळे कुटुंबियांनी चक्क गोमातेचे डोहाळे पुरवले.
८ महिन्याचं वासरू असताना तिला कसायाच्या तावडीतून सोडवण्यात आलं होतं.
गौरी तीन वर्षांची झाली असून ती गर्भावस्थेत आहे. त्यामुळे घरातल्या लेकी प्रमाणे असलेल्या गौरीचे डोहाळे पुरवण्याचा सोहळा सपकाळे कुटुंबियांनी मंत्रोच्चाराच्या साथीने थाटामाटात पार पाडला.