पुणे : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा म्हणजे भाजपचा सरकार टिकवण्याचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शिवसेनेनं साथ सोडली तर तजवीज करण्यासाठीच भाजपनं चौकशीचे अस्त्र अवलंबल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भाजप-शिवसेना सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांची चौकशी हा निव्वळ फार्स आहे. त्यांच्या चौकशीची घोषणा म्हणजे भाजपचा सरकार टिकवण्याचा प्रयत्न आहे, असा भडीमार पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय.
शिवसेनेनं साथ सोडली तर भाजपला राष्ट्रवादीची साथ हवीय. त्यासाठीच हा चौकशीचा फार्स आहे, असं त्यांनी पुण्यात बोलताना सांगितलं. मोदींचा कारभार म्हणजे एकाधिकारशाही आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.