तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक अहवालातील सत्य

जवखेडा तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक विभागानं दिलेल्या अहवालातली माहिती 'झी २४ तास'कडे आलीय. त्यानुसार संजय आणि जयश्री जाधव यांची हत्या गळा दाबून करण्यात आलीय. तर सुनील जाधव याचा गळा चिरून खून करण्यात आला.

Updated: Nov 4, 2014, 03:47 PM IST
तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक अहवालातील सत्य title=

जवखेडा, पाथर्डी: जवखेडा तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक विभागानं दिलेल्या अहवालातली माहिती 'झी २४ तास'कडे आलीय. त्यानुसार संजय आणि जयश्री जाधव यांची हत्या गळा दाबून करण्यात आलीय. तर सुनील जाधव याचा गळा चिरून खून करण्यात आला.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शरीराचे तुकडे केले, असंही या अहवालात म्हटलंय. अहमदनगर जिल्ह्यातल्या जवखेडा गावातल्या दलित हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपुरात धरणं आंदोलन केलं. 

शहराच्या संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं, अशी मागणी करण्यात आली. तर जळगावमधल्या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झालं. स्टेशन रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, दगडफेक करत क्रीडा संकुल भागातल्या आंदोलनकर्त्यांनी दोन दुकानांची तोडफोड केली. यात एक दुकानदार किरकोळ जखमी झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.