सातारा : संपूर्ण राज्यावर मान्सूनआधी लोडशेडिंगच्या काळ्या ढगांची गर्दी झालीय असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या कोयना धरणातला पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यानं त्यावर आधारित वीज प्रकल्प बंद करावं लागण्याची शक्यता आहे.
झी मीडियचं सहकारी वृत्तपत्र डीएनएनं दिलेल्या वृत्ता नुसार कोयना धऱणात अवघा ११ टक्के पाणी साठा असून त्याचा वीजनिर्मितीसाठी वापर करता येणं शक्य नाही. हे पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवावं लागणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनीही पाणी साठा घटल्यानं वीज निर्मिती बंद करावी लागण्याच्या शक्यतेला दुजोरा दिलाय. येत्या काही दिवसात मान्सूनचं आगमन होईल आणि पहिल्याच फटक्यात पाऊस चांगला पडेल अशी सरकारला आशा आहे.