मुंबई : दीपक केसरकर यांनी राणे कुटुंबीयांना चांगलाच टोला लागवलाय. दोन दिवसापूर्वी केसरकरांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता.
त्याविषयी विचारलं असता, राणे कुटुंबीयांची दहशत नष्ट झाली होती. ते पुन्हा एकदा आपली पाळमूळं रुजविण्याचा पर्यंत करतायत. मात्र, जनताच त्यांची दहशत दूर करेल, असे केसरकर यावेळी म्हणाले.
तसेच मोर्च्याच्या निमित्तानं राणे घरापर्यंत आलेत. त्यांनी माझ्यातील विनम्रता जरी घेतली तरी पुष्कळ असल्याचं म्हणत त्यांनी राणेंवर निशाणा साधलाय.