परभणी : गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेल्या विविध समाजातील जातपंचायतीचा जाच 'झी मिडीया'ने प्रकर्षाने उघड केला आहे.
गोंधळी समाजाच्या जातपंचायतीतला शोषण झी मीडिय़ाने काही दिवसांपूर्वी उघड केल्यावर आता कारवाईच्या भीतीने पंचांनी जातपंचायतच बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय.
भिशीच्या थकीत पैशांच्या परताव्यासाठी परभणी जिल्ह्यातील सेलूमध्ये गरीब दाम्पत्याचं आर्थिक शोषण सुरू होतं. पैसे परत देता येत नसतील तर थेट घरातल्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यापर्यंत पंचायतीची मजल गेली होती. या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलं होतं.
हे वृत्त 'झी मीडिया'ने सर्वप्रथम प्रसारीत केलं. त्याचा पाठपुरावा केला. अखेर या लढ्याला यश आलंय. बहिष्कृत कुटुंबाला पुन्हा समाजात सामावून घेण्यात आलं.
झी मीडिया पाठीशी उभी राहिल्यानेच जातपंचायत बरखास्त झाल्याची बोलकी प्रतिक्रिया या कुटुंबाने दिलीय.