अलिबाग : भूसंपादन उपजिल्हाधिकारी मारहाण प्रकरणी आमदार सुरेश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाड यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणू कर्जतमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी भूसंपादनचे उप जिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्याच्या काही गावांमधून रिलायन्स कंपनीची गयास पाईप लाईन जाणार आहे याला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे.
मध्यन्तरी या अधिकाऱ्यांचे सर्व दप्तर पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले होते. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया थांबविण्यात आली होती मात्र अलीकडे पुन्हा भूसंपादन प्रक्रिया पुन्हा सुरु झाल्याने भूसंपादन विभागाने शेतकऱ्यांना नोटीस दिल्या आणि त्यांची एक बैठक कर्जत तहसील कार्यालयात सुरु असताना या ठिकाणी स्थानिक आमदार सुरेश लाड हे येऊन ही भूसंपादन प्रक्रिया होऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन उपस्थित भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर याना मारहाण केली.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. दरम्यान यातील मारहाण झालेले अधिकारी यांनी अदयापपर्यंत पोलिसात तक्रार दिली नाही तर उलट आमदार सुरेश लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मारहाण केली नसल्याचा दावा केला आहे. एखाद्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होऊनी राजपत्रित अधिकारी संघटना अजून गप्प असल्याने अधिकारी वर्ग दबक्या आवाजात आपली नाराजी व्यक्त करीत आहे.