नांदेड : निवडणूक प्रचारानिमित्त नांदेड दौऱ्यावर आलेल्या धनंजय मुंडेनी कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारावर टीका करुन नाव न घेता कोंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर निशाणा साधला.
काँग्रेसची सत्ता असलेल्या अर्धापुरमध्ये लोकशाही पायदळी तुडवली जात असल्याचे मुंडे म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर नगर पंचायतीच्या प्रचार सभेत बोलत होते.
निवडणुका आल्या की कॉंग्रेसकडून उमेदवारांवर दबाव टाकला जातो, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात, अश्याप्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्याच काम कॉंग्रेसकडून केलं जात असल्याची टीका मुंडेंनी केली. एकहाती सत्ता असलेल्या अर्धापुर नगर पंचायती मधील भ्रष्टाचारावरही धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली.