धुळे : लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांची बातमी कायमचीच असते, पण लाच देणे हा सुद्धा गुन्हा आहे. तेव्हा अधिकाऱ्याला लाच देणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. धुळे तुरूंगाचे प्रभारी अधिक्षक सचिन साळवे यांनी लाच देणाऱ्या विरोधात तक्रार केली. यानंतर अॅण्टी करप्शनने सापळा रचून तौफिक पठाणला अटक केली आहे.
लाच देणारा आरोपी तौफिक पठाणचे नातेवाईक बँक दरोडा प्रकरणी धुळे जेलमध्ये आहेत, त्यांना सोयीसुविधा देण्यासाठी त्यांनी सचिन साळवे यांना लाच देऊ केली होती.
सचिन साळवे यांच्यावर मागील काही दिवसांपासून कैद्यांना सोयी सुविधा देण्यासाठी, लाच घ्या, पण सुविधा द्या असा दबाव आणण्यात येत होता, मात्र सचिन साळवे यांनी लाच नाकारली आणि अखेर लाच देणाऱ्यालाच रंगेहात पकडून दिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.