जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, कुटुंबाला न्याय मिळणार?

रत्नागिरी येथील शासकीय जलतरण तलावात बुडून दिगंबर शशिकांत रहाटे या तरुणाचा मृत्यू झाला. ७ मे रोजी ही दुर्दैवी घटना घडली.

Updated: May 14, 2015, 01:37 PM IST
जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, कुटुंबाला न्याय मिळणार? title=

रत्नागिरी : रत्नागिरी येथील शासकीय जलतरण तलावात बुडून दिगंबर शशिकांत रहाटे या तरुणाचा मृत्यू झाला. ७ मे रोजी ही दुर्दैवी घटना घडली.

दिगंबर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकत होता. त्याची घरची परिस्थिती बेताची आहे. रिक्षा चालवून वडिल घर चालवतात. दिगंबरच्या मृत्यूनं एका कष्टकरी बापाची स्वप्न उद्ध्वस्त झालीत. या घटनेला जबाबदार असणारे  क्रिडाधिकारी, ठेकेदार आणि लाईफ गार्डवर कारवाईची मागणी नागरिक
करताय आहेत. 

या जलतरण तलावाचा खासगी ठेका ३१ मार्चला संपला होता. त्यानंतर जिल्हा क्रिडाधिकाऱ्यांनी याचा ठेका रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटनेला दिला. मात्र, हा ठेका दिल्यानंतर अनेक तक्रारी यांच्याविरोधात येत होत्या. मात्र क्रिडाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप केला जातोय. 

या घटनेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं जाणार असल्याचं क्रिडाधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर दिगंबर नेमका कसा बुडाला हे आम्हालाही माहिती नसल्याचं ठेकेदाराचं म्हणणं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.