नाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त

मालेगाव दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त करण्यात आली आहे. मालेगावच्या 14 शेतक-यांची जमीन 2001 साली पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्या बदल्यात या 14 शेतक-यांना नऊ कोटी 64 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र पंधरा वर्ष झाली तरी हा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळं न्यायालयानं थेट जिल्हाधिका-यांची गाडी आणि खुर्चीच जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईसाठी न्यायालयाचे अधिकारी, कर्माचारी, शेतक-यांचे वकील आणि शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते. 

Updated: Apr 12, 2016, 09:11 PM IST
नाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त  title=

नाशिक : मालेगाव दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त करण्यात आली आहे. मालेगावच्या 14 शेतक-यांची जमीन 2001 साली पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्या बदल्यात या 14 शेतक-यांना नऊ कोटी 64 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र पंधरा वर्ष झाली तरी हा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळं न्यायालयानं थेट जिल्हाधिका-यांची गाडी आणि खुर्चीच जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईसाठी न्यायालयाचे अधिकारी, कर्माचारी, शेतक-यांचे वकील आणि शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते.