कोकणात ३ जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

 रायगडमध्ये 59 जागा सिधुदुर्गमध्ये 50 जागा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रचाराचा शेवटच्या दिवशी उमेदवारांनी सभा न घेता प्रत्येकजण डोअरटू डोअर प्रचार करत होता तसेच रॅली देखील काढण्यात आल्या.

Updated: Feb 19, 2017, 07:07 PM IST
कोकणात ३ जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या title=

रत्नागिरी : रायगडमध्ये 59 जागा सिधुदुर्गमध्ये 50 जागा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रचाराचा शेवटच्या दिवशी उमेदवारांनी सभा न घेता प्रत्येकजण डोअरटू डोअर प्रचार करत होता तसेच रॅली देखील काढण्यात आल्या.

रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर खेड तालुक्यातील फुरूस जिल्हा परिषद गटाकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय. कारण या ठिकाणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे बंधू चंद्रकांत उर्फ आण्णा कदम हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेहूणे अजय बिरवटकर हे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे या जिल्हा परिषद गटाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

गुहागर तालुक्यातील अंजनवेल जिल्हा परिषद गटातून आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी कार्यकर्ते आणि पंचायत समितीचे उपसभापती सुरेश सावंत हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

रत्नागिरीच्या शिरगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे जिल्हा अध्यक्ष बाळ माने यांच्या पत्नी माधवी माने या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवसेनेकडून भाई सावंत यांच्या पत्नी स्नेहा सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x