सैनिकांच्या पत्नीविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर परिचारकांची दिलगिरी

सैनिकांच्या पत्नीविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Updated: Feb 19, 2017, 05:59 PM IST
सैनिकांच्या पत्नीविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर परिचारकांची दिलगिरी title=

सोलापूर : सैनिकांच्या पत्नीविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी ते सोलापुरातल्या भोसे गावात आले होते.

या प्रचारसभेत त्यांनी जवानांच्या पत्नीविषयी संतापजनक वक्तव्य केलं होतं. परिचारक यांच्या या वक्तव्याचा विरोधकांसोबतच सोशल नेटवर्किंगवरूनही निषेध नोंदवण्यात आला. यानंतर परिचारक यांना दिलगिरी व्यक्त करण्याची उपरती झाली.