दिवा येथे शिवसेना शाखा प्रमुखाची हत्या

दिवा येथील शिवसेना शाखा प्रमुख संदीप वामन पाटील यांची सोमवारी सकाळी गोळ्या झाडून आणि त्यानंतर तलवारीने वार करून निर्घुन हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावातील व्यवहार ठप्प होते.

Updated: Jan 20, 2015, 01:25 PM IST
दिवा येथे  शिवसेना शाखा प्रमुखाची  हत्या title=

ठाणे : दिवा येथील शिवसेना शाखा प्रमुख संदीप वामन पाटील यांची सोमवारी सकाळी गोळ्या झाडून आणि त्यानंतर तलवारीने वार करून निर्घुन हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावातील व्यवहार ठप्प होते.

संदीप (३५) हे बांधकाम व्यावसायिक होते. ते कामासाठी बाहेर निघाले होते. दिवा येथील साबे गावातल्या पाटील यांच्यावर सकाळी साडेनऊच्या सुमारास घराजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला. डोक्‍यात गोळ्या घातल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांच्यावर तलवारीने वार केले. त्यांना डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

 बांधकाम व्यावसायिक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांचा या परिसरातील भूखंडावरून काहीजणांसोबत वाद सुरू होता. यातूनच त्यांची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाच वर्तविण्यात आलाय. दरम्यान ज्येष्ठ शिवसैनिकांची हत्या झाल्याने दिवा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.