बेळगावात दिवाकर रावते आणि दीपक सावंतना बंदी

जय महाराष्ट्रवरुन कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील वाद पेटण्याची चिन्हं आहेत. जय महाराष्ट्रच्या घोषणेबाबत वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सीमाभागातील बांधवांनी मोर्चा आयोजित केला आहे.  

Updated: May 25, 2017, 10:01 AM IST
बेळगावात दिवाकर रावते आणि दीपक सावंतना बंदी title=

बेळगाव : जय महाराष्ट्रवरुन कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील वाद पेटण्याची चिन्हं आहेत. जय महाराष्ट्रच्या घोषणेबाबत वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सीमाभागातील बांधवांनी मोर्चा आयोजित केला आहे.  

या मोर्चात शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते आणि दीपक सावंत सहभागी होणार आहेत. मात्र, कर्नाटक सरकारने आपला अडमुठेपणा कायम ठेवत महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांना बेळगावात प्रवेशबंदी केली आहे.  

कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिलाय. या आदेशानुसार परिवाहन मंत्री दिवाकर रावते आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना 24 ते 27 मे पर्यंत बेळगावात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे.  

शिवसेनेनं मोर्चात सहभागी होण्याची गरज नसल्याचं महाराष्ट्र एकीकरण समितीनं सांगितल्याचं दिवाकर रावतेंनी सांगितलंय. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असं रावतेंनी स्पष्ट केलं आहे.