पुणे : असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि विठुरायाच्या जयघोषात आज रिंगण सोहळे पार पडले. माऊलींचं उभं आणि गोल रिंगण पार पडलं तर तुकोबांचही उभं रिंगण सोहळा पार पडला.
बाजीरीव विहीर इथं हा रिंगण सोहळा रंगला होता. माऊलींचं हे चौथं आणि अखेरचं गोल रिंगण होतं. दरम्यान उद्या माऊलींचं आणि तुकोबा पालखींचं उभं रिंगण पार पडेल. पंढरीच्या वारीला निघालेल्या वैष्णवांचा मेळा आज वाखरीमध्ये भरणार आहे. माऊली, तुकोबांसह इतर पालख्याही आज वाखरीत मुक्कामी असेल.
तुकोबांच्या पालखीचं वाखरीमध्ये आगमन झालं आणि त्याचक्षणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वानेही माऊलींना प्रदक्षिणा घालण्यासाठी रिंगण सुरु केलं, हे विशेष... यावेळचं दृश्य केवळ अवर्णीय होतं.
दरम्यान, यंदा दहा ते बारा लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी पहिल्यांदाच वारकऱ्यांच्या सोयीसाठी राहण्याची सोय नदीच्या पलिकडे तीरावर करण्यात आलीय. यासाठी प्रशासनानं नदीच्या पलीकडील तीरावरील ६५ एकर जागा ठेवली आहे. या ६५ हजार एकर जागेवर वारकऱ्यांसाठी रस्ते, स्वच्छागृह, विजेची सोय आणि शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलीय.
पंढरपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद मिळावा यासाठी विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीची जय्य्त तयारी सुरु आहे. भाविकांना प्रसाद म्हणून १० लाख बुंदीचे लाडू आणि २ लाख राजगिरा लाडू तयार करण्यात येत आहेत. जवळपास १२ लाखांहून अधिक भाविकांना प्रसाद म्हणून लाडू वाटण्यात येणार लाडू हे उत्तम प्रतिचे असतील अशी माहिती मंदिर समितीकडून देण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.