'त्या' चिमुरडीच्या आईचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी एकाला अटक झालीय. या महिलेचा डोक्यात दगड घालून खून झाला होता... तिच्या मृतदेहाशेजारीच एक लहानगीही रडताना आढळली होती. २४ तास उलटण्याच्या आतच पोलिसांनी या हत्येतील मारेकऱ्याचा शोध लावलाय.

Updated: Jul 25, 2015, 11:21 PM IST
'त्या' चिमुरडीच्या आईचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात title=

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी एकाला अटक झालीय. या महिलेचा डोक्यात दगड घालून खून झाला होता... तिच्या मृतदेहाशेजारीच एक लहानगीही रडताना आढळली होती. २४ तास उलटण्याच्या आतच पोलिसांनी या हत्येतील मारेकऱ्याचा शोध लावलाय.

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी शिवारात गुरुवारी रात्री ही घटना घडलीय. महिलेच्या पहिल्या पतीच्या पुतण्यानं ही हत्या केल्याचं समोर आलंय. सिद्धराम खांडेकर (२५ वर्ष) असं आरोपीचं नाव आहे. तो सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातला आहे. 

ही महिला तिच्या पहिल्या पतीपासून 16 वर्षांपासून वेगळी राहतेय. तिनं संपत्तीत वाटा मागितल्यामुळे ही हत्या झाल्याचा संशय आहे. महिलेच्या मृतदेहाशेजारी सापडलेली मुलगी ही मुंबई स्थित शंकर मेहता या चौथ्या पतीपासून झालेली तिचीच मुलगी असल्याचंही स्पष्ट झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.