डोंबिवलीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्यांना अटक

नॅशनल क्राईम ब्युरोचे सदस्य असल्याची बतावणी करीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्या तिघांना डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. 

Updated: Dec 12, 2015, 02:57 PM IST
डोंबिवलीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्यांना अटक  title=

डोंबिवली : नॅशनल क्राईम ब्युरोचे सदस्य असल्याची बतावणी करीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्या तिघांना डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. 

भास्कर रॉय, अनिमेश रॉय आणि मुकेश यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे आणि दिव्यातील ते रहिवासी आहेत. त्यांच्याकडून कॅमेरा आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो कार ताब्यात घेतली आहे. तर या प्रकरणातील एक महिला आरोपी फरारी असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

डोंबिवली निळजे येथील लोढा हेवन परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणारे योगेश म्हस्के यांचे क्लिनिक आहे. ते त्यांच्या क्लिनिकमध्ये असताना आरोपींनी दिल्ली येथील नॅशनल क्राईम ब्युरोचे सदस्य असल्याची बतावणी केली आणि तुम्ही खोटी मेडिकल सर्टिफिकेट्स देता यावर दंड म्हणून  ६० हजार रुपयांची मागणी केली.

दंड न भरल्यास कडक कारवाई करण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिली. तेव्हा म्हस्के यांना संशय आला,त्यांनी त्या सदस्यांना बोलण्यात गुंतवून पोलिसांशी संपर्क साधला. या चौकडीने अनेक डॉक्टरांना अशा प्रकारे फसवल्याचे समोर आलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.