सावधान, तुम्ही खरेदी करत आहात मुदतबाह्य औषधे!

मुदतबाह्य औषधांवर नव्याने लेबल लावण्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. 

Updated: Dec 12, 2015, 02:44 PM IST
सावधान, तुम्ही खरेदी करत आहात मुदतबाह्य औषधे! title=

नांदेड : मुदतबाह्य औषधांवर नव्याने लेबल लावण्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. 

नांदेड एमआयडीसी परिसरातील क्रिष्मेड फार्माच्या गोडाऊनमध्ये हा गोरखधंदा सुरू होता. याची कुणकूण सिडको ग्रामीण पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी या गोडाउनवर छापा मारला. पोलिसांनीनंतर याची माहीती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याला दिली. 

७ डिसेंबरला ही कारवाई करण्यात आली होती. या ठिकाणी फेनीड ए एस नावाच्या मुदतबाह्य औषध बाटल्यांवरील लेबल काढून त्यावर नवीन लेबल लावण्याचा प्रकार सुरू होता.

हे औषध गर्भवती महिला आणि लहान मुलांना रक्तवाढीसाठी देण्यात येते. या प्रकरणात कुठलाही गुन्हा मात्र दाखल करण्यात आला नव्हता. पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासनाने या कारवाईत अफरातफर केल्याच्या बातम्या येताच एक व्हिडिओ व्हायरल झाला.

बाटलींवरील लेबल काढले जात असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. तेव्हा कुठे अन्न व औषध प्रशासनाने जागे होत क्रिष्मेड फार्माविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.