दुकानात चोरी करणारी महिलांची टोळी सीसीटीव्हीत कैद

आता एक बातमी सावधानतेचा इशारा देणारी... खास करुन दुकानदारांसाठी... तुम्ही दुकानात असाल, तर येणाऱ्या जाणाऱ्यावर बारिक लक्ष ठेवा. आता आम्ही तुम्हाला जे दृश्य दाखवत आहोत, त्यामध्ये एका लहान मुलीनं टॅब कसा चोरला ते सहज दिसून येत आहे. 

Updated: Aug 10, 2015, 12:17 PM IST
दुकानात चोरी करणारी महिलांची टोळी सीसीटीव्हीत कैद title=

डोंबिवली: आता एक बातमी सावधानतेचा इशारा देणारी... खास करुन दुकानदारांसाठी... तुम्ही दुकानात असाल, तर येणाऱ्या जाणाऱ्यावर बारिक लक्ष ठेवा. आता आम्ही तुम्हाला जे दृश्य दाखवत आहोत, त्यामध्ये एका लहान मुलीनं टॅब कसा चोरला ते सहज दिसून येत आहे. 

डोंबिवलीतल्या एका दुकानामध्ये भीक मागण्याच्या हेतूनं दोन तीन महिलांसोबत ही लहान मुलगीही दुकानात शिरली. मात्र ती सगळ्यात मागे होती. दुकानात शिरलेल्या महिलांनी मालकासमोर भीक मागितली. त्यावेळी त्यांच्या आड लपून, या मुलीनं ठेवलेला टॅब बरोबर उचलून झोळीत टाकला. 

ज्याप्रकारे त्यांनी हे काम केलं, त्यावरुन त्या सराईत चोर असल्याचं सहज लक्षात येत आहे. म्हणून सावध राहण्याची गरज आहे. दरम्यान डोंबिवली पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाहीय. अशा चोऱ्या अनेक होतात, आम्ही कुठे-कुठे जाणार असं म्हणत तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचं कळतंय. 

पाहा व्हिडिओ - 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.