नागपूर: राज्यातल्या जेलची सुरक्षाव्यवस्था आणखी वाढवण्यासाठी कंबर कसलीय. जेलच्या भिंतींभोवती विद्युत प्रवाहाचं कुंपण बसवण्याचा सरकारनं विचार केलाय. जेलमधून कैदी फरार होण्याच्या घटना रोखण्यासाठी सरकारनं अशाप्रकारे सुरक्षा कडं बसवण्याचा निर्णय घेतलाय.
एखाद्या कैद्यानं जेल तोडून पळण्याचा प्रयत्न केल्यास विद्युत प्रवाहाच्या कुंपणामुळं अलार्म वाजेल अशी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च येणार असून सरकार याबाबत लवकरच निविदा मागवणार आहे.
नुकताच राज्य सरकारच्या गृह खात्यातील प्रतिनिधींनी इस्राईलचा दौरा केला होता. यावेळी इस्राईलमधील जेलसुरक्षेचा आढावा घेऊन त्या पद्धतीची सुरक्षायंत्रणा राज्यातल्या जेलमध्ये अवलंबण्याचा सरकारचा विचार आहे. याची सुरुवात जेलच्या भिंतींभोवती विद्युत प्रवाहाचं कुंपण घालून करण्यात येणार आहे. इस्राईल पॅटर्नच्या इतर सुरक्षा बाबींचाही सरकार गांभीर्यानं विचार करतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.