पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता २१ महिने पूर्ण झाले असतांनाच आता हत्येच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
सीबीआयनं डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या सहा प्रत्यक्षदर्शींच्या मदतीनं दोन मारेकऱ्यांचं रेखाचित्र तयार केलंय. हे रेखाचित्र अधिक स्पष्ट असल्यानं तपास योग्य दिशेनं जाण्याची शक्यता असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे.
सीबीआयनं आपल्या पद्धतीनं नव्यानं डॉ. दाभोलकर हत्येचा तपास सुरू केलाय. आता ही रेखाचित्रं प्रसिद्ध केलीय. आता तरी डॉ. दाभोलकरांचे मारेकरी पकडले जातात का? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.