'मध्यावधी निवडणुका झाल्यास महाराष्ट्राचं नुकसान नाही'

अडीच वर्षांमध्येच निवडणुका झाल्या तर महाराष्ट्राचं फारसं नुकसान होणार नाही

Updated: Feb 13, 2017, 10:53 PM IST
'मध्यावधी निवडणुका झाल्यास महाराष्ट्राचं नुकसान नाही' title=

मुंबई : अडीच वर्षांमध्येच निवडणुका झाल्या तर महाराष्ट्राचं फारसं नुकसान होणार नाही, असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. 23 तारखेनंतर तशी परिस्थिती उद्भवलीच तर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे, असंही पवार म्हणाले आहेत.

शिवेसना-भाजपची महापालिका निवडणुकांसाठी युती तुटली आहे. यानंतर रोजच हे दोन्ही पक्ष एकमेकांवर घणाघाती टीका करत आहेत. सध्याचं फडणवीस सरकार हे नोटिस पीरियडवर असल्याचंही शिवसेनेनं सांगितलं आहे, पण सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यातच आता शरद पवारांनी हे वक्तव्य करून मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले आहेत.