विकास भदाणे, जळगाव : घराबाहेर एकट्या बाहेर पडणा-या महिला आणि मुलींना आता चिंता करण्याचं कारण नाही. कारण त्यांच्या सुरक्षेसाठी एक खास जॅकेट तयार करण्यात आलंय... ज्यामुळे महिलांचं संरक्षण होणारच आहे शिवाय छेड काढणा-याला चांगलीच अद्दल घडू शकणाराय.
हे जॅकेट अंगावर चढवलेल्या महिला किंवा मुलीची कुणी छेड काढली, तर त्याला वीजेचा धक्काच सहन करावा लागणारेय. त्याचवेळी संबंधित महिला किंवा मुलीच्या घरच्यांना सुद्धा, तिला असलेल्या धोक्याची सूचना मिळणाराय. ही सारी करामत शक्य होणार आहे ते एका आपतकालीन बटनामुळे... जळगावतल्या योगेश बारी यांनी हे वैशिष्ट्यपूर्ण जॅकेट तयार केलंय. अवघ्या दीड हजार रुपयांचं हे जॅकेट लेदर आणि ऍल्युमिनिअमच्या साहाय्यानं तयार करण्यात आलंय.
जॅकेटमधून विद्युतप्रवाह वाहत असला तरी जॅकेट घालणाऱ्या महिलेला यापासून कोणताही धोका नाही. कुणी छेड काढली तर शॉक बसेल पण जीवाचा धोका नाही अशी या जॅकेटची रचना करण्यात आली आहे.
या जॅकेटमुळे महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झालीय. तर पालकांनीही निश्चिंतता व्यक्त केलीय.
देशभरात महिलांविरोधात अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. मात्र या जॅकेटच्या माध्यमातून महिलांना स्वसंरक्षणाचा एक सक्षम पर्याय नक्कीच उपलब्ध झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.