महागडे मोबाईल, बाईक चोरणारे अट्टल चोर गजाआड

महागडे मोबाईल आणि बाईक चोरणारे २ अट्टल इराणी आरोपींना कल्याण पोलिसांनी गजाआड केलं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 26, 2017, 10:52 AM IST
महागडे मोबाईल, बाईक चोरणारे अट्टल चोर गजाआड title=

कल्याण : महागडे मोबाईल आणि बाईक चोरणारे २ अट्टल इराणी आरोपींना कल्याण पोलिसांनी गजाआड केलं आहे. मम्मू उर्फ वसीम इराणी आणि सैय्यद इराणी अशी त्यांची नावं आहेत. 

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या यादीत टॉप २० वॉन्टेड आरोपींमध्ये त्यांचा समावेश होता.  लोकल ट्रेनमध्ये मोबाईल फोन चोरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे.

 मोबाईल फोनच्या जास्तच जास्त चोऱ्या या सेंट्रल आणि हार्बर लाईनला होत असल्याचं निदर्शनाला आलं आहे.