फलटण नगरपालिका निवडणुकीत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेसचे मोठे आव्हान

जिल्ह्यातील फलटण नगरपालिका निवडणुकीत गेल्या २५ वर्षे एकहाती सत्तेत असलेल्या विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेसने जोरदार आव्हान उभे केलंय. यावेळी रामराजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ल्ला अभेदद्य ठेवणार का ? की त्याला खिंडार पडणार याकडे राज्याचे  लक्ष लागून राहिले आहे.

Updated: Nov 18, 2016, 10:07 PM IST
फलटण नगरपालिका निवडणुकीत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेसचे मोठे आव्हान title=

सातारा : जिल्ह्यातील फलटण नगरपालिका निवडणुकीत गेल्या २५ वर्षे एकहाती सत्तेत असलेल्या विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासमोर काँग्रेसने जोरदार आव्हान उभे केलंय. यावेळी रामराजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ल्ला अभेदद्य ठेवणार का ? की त्याला खिंडार पडणार याकडे राज्याचे  लक्ष लागून राहिले आहे.

सातारा जिल्ह्यातल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत गेली 25 वर्षे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची निर्विवाद सत्ता आहे. सत्तेचं हेच वर्चस्व टिकवण्यासाठी रामराजे निंबाळकरांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी ते स्वत: प्रचारात उतरलेत. 

तर गेली 25 वर्षे फलटणमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीसमोर काँग्रेसनं जोरदार आव्हान उभं केलंय. बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी प्रचारातही आघाडी घेतलीय. खड्ड्यांमुळे वाहतूक समस्या निर्माण झालीय, कच-याचा प्रश्न सुटलेला नाही. राष्ट्रवादीची एवढी वर्षे सत्ता असूनही फलटणचा विकास न झालेला नाही. त्यामुळे यावेळी परिवर्तन होत काँग्रेसचाच विजय होईल असा विश्वास रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलाय. 

फलटणमध्ये तिरंगी लढत होत असून रामराजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, रणजितसिंहांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि सुशांत निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवतायत... आता रामराजे नाईक निंबाळकर आपला बालेकिल्ला अभेद्य ठेवणार की काँग्रेस त्याला खिंडार पाडत परीवर्तन घडवणार हे येत्या 28 नोव्हेंबरला समोर येईल.