दोन मुलींना ठार करून पित्यानंही केली आत्महत्या!

आपल्या दोन मुलींची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  बदलापुरात  घडलीय. 

Updated: Sep 29, 2014, 01:31 PM IST
दोन मुलींना ठार करून पित्यानंही केली आत्महत्या! title=
प्रातिनिधिक फोटो

बदलापूर : आपल्या दोन मुलींची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  बदलापुरात  घडलीय. 

या पित्याचं नाव पवनकुमार वर्मा असं आहे. पवनकुमार हा ठाणे येथील लोकमान्य नगर भागात राहणारा असून त्याने दीड महिन्यांपूर्वी बदलापुर येथील चामटोली भागात असणा-या पोद्दार एव्हर ग्रीन संकुलात नविन फ्लॅट घेतला होता.

पवनकुमारनं आपला जीव संपण्याआधी आपली सहा वर्षांची मुलगी कोमल आणि नऊ वर्षांची दुसरी मुलगी मिनल यांची हत्या केली... आणि त्यानंतर स्वत:चंही जीवन संपवलं.

पोलिसांना पवनकुमार, कोमल आणि मिनल तिघांचेही मृतदेह फ्लॅटमध्ये आढळले. मात्र, पवनकुमारनं हा टोकाचा निर्णय का घेतला? त्याचं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही.

पवनकुमार याने आत्महत्या करण्यापूर्वी  आपल्या आत्महत्येस कोणाला दोषी धरु नये तसेच मी माझ्या सोबत माझ्या मुलींना घेउन जात आहे, अशी चिठ्ठीही लिहून ठेवलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.