त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये हाणामारी

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरातील मंदिरात सुरक्षा रक्षक आणि भाविक यांच्यात हाणामारी झाली आहे.

Updated: Nov 6, 2016, 09:28 PM IST
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये हाणामारी  title=

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरातील मंदिरात सुरक्षा रक्षक आणि भाविक यांच्यात हाणामारी झाली आहे. या हाणामारीनंतर एक कर्मचारी आणि एक भाविक दोघांनाही दवाखान्यात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांमध्ये परस्पर विरोधी तक्रारही दाखल करण्यात आल्या आहेत.

तक्रारदार भाविक लष्कराशी संबंधित असलेल्या कुटुंबाशी संबंधित असल्यानं पोलीस अधिक खबरदारी घेत आहेत. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्यानं शेकडो भाविक त्र्यंबकनगरीत दाखल होत आहेत. मोठमोठ्या रांगा लागत असल्यानं भाविक पेड दर्शनाच लाभ घेत आहेत. मात्र ,हेच लक्षात न आल्यानं भाविक आणि सुरक्षारक्षक यांच्यात नेहमीच वादावादी होत आहे.