यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला भीषण आग लागलीय. आगीनं बहुतांश जंगल व्यापल्यामुळे अनेक प्राण्यांचा जीव धोक्यात आलाय.
वन विभाग आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असला, तरी त्यांना अद्याप फारसं यश आलेलं नाही. जंगलात मोठ्या प्रमाणात गवत असल्यानं आग पसरत चालल्याचं समजतंय.
अभयारण्यात १० वाघ आहेत. शिवाय अस्वल, नीलगायी, रोही, सांबर, चितळ, काळवीट असे अनेक प्राणीही आढळतात. शिवाय मोर, नीलकंठ, गरुड, घारी, ससाणे असे अनेक पक्षीही इथे बघायला मिळतात. या सगळ्यांचा जीव आगीमुळे धोक्यात आलाय.
मोठ्या प्रमाणात लागलेली आग नियंत्रण आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न होतायत का? असा प्रश्न आता वन्यप्रेमींनी उपस्थित केला.