विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर सगळ्यांनाच त्रास झाला, शहरी भागावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा झळा सोसाव्या लागल्या, मात्र यावर औरंगाबाद तालुक्यातील जडगाव या 1800 लोकवस्तीच्या गावानं मात केलीये.
जडगाव आता मराठवाड्यातील पहिलं कॅशलेस गाव म्हणून उदयास आलंय. पाहूयात गावात कसा चालतो हा कॅशलेस व्यवहार.
औरंगाबाद तालुक्यातील जडगाव या गावात आता तुम्हाला खिशात कँश ठेवायची गरज नाही, कारण या गावात सगळ्याच गरजा आता तुमच्या अंगठ्यावर पूर्ण होतात.. अगदी किराणा घ्यायचा असो वा, टपरीवरचा चहा प्यायचा असो , खुशाल विकत घ्या आणि अंगठा द्या, बस विक्रेत्याच्या खात्यावर पैसै जमा होऊन जाणार, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेनं ही किमया घडवून आणली आहे...
गावाची लोकसंख्या तशी 1700 आहे. गेल्या आठवड्यात गावातील 12 वर्षांवरील सर्व गावक-यांचे बँकेत खाते उघडून सर्व खाती आधार कार्ड द्वारे लिंक करण्यात आली. त्यामुळे आता सर्व खातेदार आपल्या अंगठ्या द्वारे, व्यवहार करू शकत आहेत, लवकरच स्वाईप मशीनही गावात लावण्यात येणार आहे त्यानंतर सगळ्याच अडचणी दूर होतील... बँकेन तस गावक-यांना ट्रेनिंगही दिल आहे.
कॅशलेस व्यवहार करतांना दुकानदारांनाही आनंद येतोय, सुरुवातीला नोटा बंद झाल्यावर त्रास झाला मात्र आता हा नवा प्रकार सुरु झाल्यानं सुट्या पैशांचा प्रश्नच कायम मोडीत निघाल्याच दुकानदार सांगताय..
तर खर्च करण्याचा हा नवा प्रकार गावक-यांनाही भावला आहे, अगदी गावातील लहान मोठ्यांपासून तर गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही याच स्वागत केलं आहे, खिशात पैसै न ठेवता जगण्याची मजाच काही और असल्याचं त्यांच म्हणणं आहे.
जडगाव सारखे इतर गाव देखील आता कॅशलेस करण्याकडे बँक आणि जिल्हा परिषदेचा कल असणार आहे. प्रत्येक तालुक्यातील दोन गाव कॅशलेस करण्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून करणार आहे
खरं तर नोटाबंदीमुळं चांगलीच अडचण झाली होती मात्र तयारी असेल तर प्रश्न सुटू शकतात आणि अगदी ग्रामीण , मागास असलेला भागही कॅशलेस होऊ शकतो याच उदाहरण जडगावन घालून दिलय.. आणि नोटा आणि सुट्या पैशांच्या प्रश्नावर त्यांनी मातही केलीये....