औरंगाबाद: औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल रफिक शेख यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले पोलीस कॉन्स्टेबल आहेत. लहानपणापासून जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर चढाई करायची असं स्वप्न रफिक शेखन यांनी उराशी बाळगलं होतं.
पहिल्या वर्षी हिमस्खलन, दुस-या वर्षी प्रलयंकारी भूकंपामुळे एव्हरेस्टच्या दिशेने कूच केलेली असतानाही त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र यामुळं त्यानं हार मानली नाही. यावर्षी गावातलं घर विकून एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय त्यानं घेतला. अखेर 4 एप्रिलला एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या रफिक यांनी 20 मे रोजी एव्हरेस्ट सर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रफिक शेख यांचं ट्विटरवरून कौतुक केलं आहे.
Constable Rafiq Shaikh hoisted Maharashtra Police flag at the Mt Everest,this morning.Awaiting to speak to him soon. pic.twitter.com/VhFZGuONMn
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) 19 May 2016
Such a proud moment!
Our Aurangabad Police Constable becomes the 1st policeman from Maharashtra to scale Mt Everest! pic.twitter.com/e5CXbVLPTc— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) 19 May 2016