नाशिक : नाशिकमधली पूरस्थिती जैसे थेच आहे. आजही मंदिरं आणि गोदाकाठचा परिसर पाण्याखाली आहे. आजही नाशिकमधल्या शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली. पुढचे दोन दिवस मुसळधार राहील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. आतापर्यंत शेकडो कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय.
ठिकठिकाणचे आपत्ती नियंत्रण कक्ष सतर्क झाले असून बचाव कार्य जोमाने सुरु झालंय. देवळाली कँम्प आर्टिलरी सेंटर मधील दोन चॉपरसह ३०० जवान आपत्कालीन परस्थिती साठी राखीव ठेवण्यात आले आहे.
आत्तापर्यंत तीन जण वाहुन गेले आहेत. मात्र त्यांचा शोध लागलेला नाही. कालिका पंपिंग स्टेशनमध्ये पाणी गेल्यामुळे आज आणि उद्या नाशिक शहरातल्या काही भागात पाणी पुरवठा होणार नाही.