औरंगाबाद : माजी आदिवासी विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांचं जात वैधता प्रमाणपत्र औरंगाबाद खंडपीठानं रद्द ठरवलंय.
पिचडांकडे महादेव कोळी जातीचं वैधता प्रमाणपत्र होतं. पण नागपूरच्या महाराष्ट्र आदिवासी मन्ना जमात मंडळाने त्यांच्या वैधता प्रमाणपत्रला आव्हान दिलं होतं.
कोर्टानं पिचड हे कोळी महादेव जातीचे असताना त्यांनी महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र सादर केलं होतं. खंडपीठाच्या निर्णयामुळे आता पिचड यांना अनुसुचित जमातीसाठीचं मिळणारं आरक्षण घेता येणार नाही हे स्पष्ट झालंय.