पुणे : पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'च्या अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आलीय. या नियुक्तीला इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी मात्र विरोध दर्शवलाय.
गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. चौहान यांच्या नियुक्तीमागे राजकारण असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या क्षमतांविषयी शंका उपस्थित केलीय.
आमचे प्रश्न आणि इथल्या संस्कृतीची ओळख असलेल्या व्यक्तीला हे पद दिलं जावं, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय.
तर, यावर प्रतिक्रिया देताना गजेंद्र चौहान यांनी मात्र आपल्या दशकभराच्या अनुभवाचा एफटीआयआयला फायदाच होईल... माझ्याकडे सिने क्षेत्राचा अनुभव नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल असं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.