नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच अट्टल गुंड फरार झालेत. यापैकी सत्येद्र गुप्ता, मोहम्मद शोएब, बिनेश उईके हे तिघे मोक्काचे आरोपी असून त्यांच्यावर प्रत्येकी २० ते २५ गुन्ह्यांची नोंद आहे.
प्रेम नेपाली आणि आकाश ठाकूर हे घरफोडी, चोरीचे आरोपी आहेत. हे सर्वजण नागपूरातल्या कुख्यात राजा गवस गँगचे गुंड आहेत. पहाटे २ ते ४ च्या दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज आहे. हे गुंड नेमके कसे पळाचे याबाबत अधिक तपास सुरू आहे...या प्रकरणानंतर जेलचे अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
नागपूरच्या या करागृहात १९९३ बॉम्ब ब्लास्टमधील याकूब मेनन जर्मन बेक्रिचा आरोपी हिमायत बेग आणि डॉन अरुण गवळी बंदिस्त आहेत. त्यामुळे इतक्या संवेदनशील जेलमधून हे पाच कैदी कसे काय फरार झालेत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.