नागपूर : नागपूरच्या शासकीय अपंग वसतिगृहात दोघा नराधमांनी एका अल्पवयीन अपंग मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय.
या घटनेतील पीडित मुलगी अवघ्या १६ वर्षांची असून गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून तिच्यावर अत्याचार करण्यात येत होते.
कृष्ण बावणे आणि भरत कांबळी अशी या नराधमांची नावं असून बावणे हा वसतिगृहात केअर टेकरचं तर कांबळी हा आचाऱ्याचं काम करत होता.
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राहणारी ही पिडीत मुलगी आपल्या घरी गेली तेव्हा ती पाच महिने गरोदर होती. तिच्या आईला हे समजले तेव्हा नागपूरच्या राणा प्रताप नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी कारवाई करत दोघा आरोपींना अटक केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.