सोन्याची मिठाई, चक्क ९ हजार रुपये किलो...

ठाण्यातील प्रशांत सकपाळ या मराठी उद्योजकाने दिवाळी निमित्त आपल्या प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानात चक्क सोन्याचा वर्ख लावलेली मिठाई विक्रीस ठेवलीये..

Updated: Nov 4, 2016, 11:22 PM IST
सोन्याची मिठाई, चक्क ९ हजार रुपये किलो... title=

ठाणे : ठाण्यातील प्रशांत सकपाळ या मराठी उद्योजकाने दिवाळी निमित्त आपल्या प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानात चक्क सोन्याचा वर्ख लावलेली मिठाई विक्रीस ठेवलीये..

पिस्ता, भामरा बदाम, काश्मिरी केसर, वेलची अशा विविध फ्लेवर्समध्ये ही मिठाई उपलब्ध असून त्यावर चक्क 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावण्यात आलाय.. त्यांची ही मिठाई सातासमुद्रापार पोहचल्याचा दावा दुकानाचे व्यवस्थापक जयंत कदम यांनी केलाय..

ही सोन्याची मिठाई 9 हजार रुपये प्रती कोलो इतकी महाग आहे... मात्र महाग असूनही 160 किलो मिठाईची विक्री झाल्याची माहिती कदम यांनी दिलीये..