लवकरच महाराष्ट्रातही 'सुवर्ण मंदिर'!

आंध्रप्रदेश , कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांचे मंदिर हे अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर सुवर्ण मंदिर बनविण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात.

Updated: Jun 12, 2015, 09:46 PM IST
लवकरच महाराष्ट्रातही 'सुवर्ण मंदिर'! title=

संजय पवार, सोलापूर : आंध्रप्रदेश , कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांचे मंदिर हे अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर सुवर्ण मंदिर बनविण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात.

मंदिर समितीने भाविकांना आव्हान करतच दोनशे किलो चांदी आणि सोळा लाख रुपये जमा झालेत, महाराष्ट्रातील मोठे पर्यटन आणि धार्मिक स्थळ म्हणून त्याचा विकास करण्याचा मानस मंदिर समितीनं व्यक्त केलाय.

अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर सोलापुरातही सुवर्ण मंदिर उभं राहणार आहे. श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पुरातन हेमाडपंथी मंदिराला सुवर्ण मंदिराप्रमाणं भौगोलिक पार्श्वभूमी लाभलीय. त्यातूनच मंदिर समिती अध्यक्ष धर्मराज काडादी यांना ही कल्पना सुचली आणि त्यांच्या विचारातून प्रशांत बिलगुंडे यांनी सुवर्ण मंदिराचं नक्षीकाम करण्याचं कामही सुरू केलं. 

मंदिर समितीच्या बैठकीत हे नक्षीकाम दाखवून सुवर्ण मंदिरासंदर्भातला विचार सोलापूरकरांसमोर ठेवण्यात आला. विशेष म्हणजे चार दिवसांतच मंदिर समितीकडे दोनशे किलो चांदी, सोनं आणि १६ लाखांची रोकड जमा झालीय. 

सोलापुरात सुवर्ण मंदिर उभं राहिल्यास पर्यटनवाढीला याचा फायदा होईल, हे नक्की!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.