तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर आता सरकारचं नियंत्रण

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराबाबत सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियमातील अधिकाराचा वापर करत, अधिसूचना काढून सरकारनं मंदिराच्या कारभारावर पूर्ण नियंत्रण मिळवलंय.

Updated: Mar 16, 2015, 11:14 AM IST
तुळजाभवानी मंदिराच्या कारभारावर आता सरकारचं नियंत्रण title=

तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिराबाबत सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियमातील अधिकाराचा वापर करत, अधिसूचना काढून सरकारनं मंदिराच्या कारभारावर पूर्ण नियंत्रण मिळवलंय.

झी मीडियाच्या हाती लागलेल्या कागदपत्रानुसार विधी व न्याय विभागानं २० फेब्रुवारी २०१५ ला अधिसूचना काढून राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार तुळजाभवानी तुळजाभवानी मंदिरास सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था म्हणून घोषित केलं आहे. 

१९६६च्या अनुसूचित तुळजाभवानी मंदिराचा समावेश केल्यानं मंदिराच्या कारभारावर आता सरकारचं पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे. सरकारच्या या अधिसूचनेमुळं मंदिरातील गैरव्यवहाराला चाप बसण्याची शक्यता आहे. तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंदिराच्या ट्रस्ट विरोधात न्यायालयीन खटल्यावर या अधिसूचनेचा दूरगामी परिणाम होणार आहे.                  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.