ठाणे : सरकारी रुग्णालया विरोधात नागरिकांची मोठी नाराजी आहे. व्हेंटीलेटर मशीन नाही. सिटी स्कॅन मशीन बंद आहे. त्यामुळं रुग्णांची गैरसोय होत आहे.
रुग्णालयात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी दुर्गंधी आहे. रुग्णालय इमारतीच्या गच्चीवर मोठ्या प्रमाणात भंगार पडून आहे. या सर्व परिस्थितीमुळे ठाणेकर प्रचंड नाराज आहेत. सिव्हिल इस्पितळच आजारी पडलंय, असा सूर उमटत आहे.
नवीन नियुक्त झालेले सिव्हिल सर्जन यांनी परिस्थिती सुधारण्याचं आश्वासन दिलंय. ३३६ खाटांचं हे इस्पितळ आहे. ती संख्या वाढून ५४२ करण्यास मंजुरी मिळाली आहे.