डॉ. बाबासाहेब यांचे लंडनमधील घर सरकारने केले खरेदी

ऐतिहासिक वारसा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घराच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बाबासाहेब ज्या घरात वास्तव्याला होते ते घर महाराष्ट्र राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे.

Updated: Apr 30, 2015, 12:50 PM IST
 डॉ. बाबासाहेब यांचे लंडनमधील घर सरकारने केले खरेदी title=

लंडन : ऐतिहासिक वारसा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घराच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बाबासाहेब ज्या घरात वास्तव्याला होते ते घर महाराष्ट्र राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे.

लंडनमधील हे घर खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने अंदाजे ४० कोटी रूपये खर्च केले आहेत. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव उज्वल उके यांनी खास लंडनमध्ये ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

बाबासाहेब आंबेडकर हे वास्तव्याला असलेले लंडनमधील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.