तुळजापूरबरोबरच अनेक मंदिरांच्या दानपेट्या सील

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काळा पैसा बाळगून असलेल्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे. 

Updated: Nov 11, 2016, 02:33 PM IST
तुळजापूरबरोबरच अनेक मंदिरांच्या दानपेट्या सील  title=

तुळजापूर : पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काळा पैसा बाळगून असलेल्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे. तुळजापूर मंदिरासह अनेक मंदिरांच्या दानपेट्या सील करण्याचा निर्णय धर्मादाय सहआयुक्तांनी घेतला आहे. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये हा निर्णय लागू झाला आहे. याबरोबरच मंदिर संस्थानांना त्यांच्या दानपेटीमध्ये जमा झालेल्या रकमेची माहितीही सरकारला द्यावी लागणार आहे.

बेहिशेबी पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक शकली लढवल्या जात आहेत. मोठ्याप्रमाणावर रेल्वे रिझर्वेशन करायचं आणि त्यानंतर हे रिझर्वेशन रद्द करून काळा पैसा पांढरा करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. ही गोष्ट रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनीही अशांना दणका दिला. रद्द केलेल्या तिकिटाची रक्कम चेक अथवा ईसीएसद्वारे थेट बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. १० हजारांपेक्षा जास्त रकमेच्या तिकिटांसाठी हा नियम लागू करण्यात आलाय.