गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी काही सुगावे हाती : SIT

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी काही सुगावे हाती लागले आहेत. दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले असून फुटेजमध्ये दोन मोटरसायकल आढळल्या आहेत. आरोपी कोणत्या मार्गाने पळाले ते समजले आहे, अशी माहिती SITचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Updated: Jun 6, 2015, 03:31 PM IST
गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी काही सुगावे हाती : SIT title=

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी काही सुगावे हाती लागले आहेत. दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले असून फुटेजमध्ये दोन मोटरसायकल आढळल्या आहेत. आरोपी कोणत्या मार्गाने पळाले ते समजले आहे, अशी माहिती SITचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूरमधील गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी SITने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मारेक-यांची रेखाचित्र प्रसिद्ध केलीत. दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळाले असून आरोपी कोणत्या मार्गाने पळाले हे स्पष्ट झाल्याचं एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

तसेच दोन संशयित आरोपींची रेखाचित्र जारी केल्याचंही एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं. हे संशयित २० ते २५ वर्षे वयोगटातील असू शकतात. वेगवेगळ्या पोषाखातील रेखाचित्र एसआयटीने जारी केली आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेज दाखविल्याने हल्लेखोरांना पकडण्यात यश येईल, असा दावा एसआयटीने केलाय.
 
कधी झाला होता हल्ला? 
पानसरे दाम्पत्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी ते राहात असलेल्या सागरमळा परिसरात दोन बंदुकीतून प्राणघातक हल्ला केला होता. कोल्हापुरात सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी हा हल्ला झाला होता.
 
या हल्ल्यात गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा जखमी झाल्या होत्या. मात्र कॉ. पानसरे गंभीर जखमी होते. त्यांच्यावर कोल्हापुरातच उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी कॉ. पानसरेंना मुंबईला आणण्यात आलं होतं. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.  .
 
या हत्येचा तपास साडेतीन महिन्यानंतर एसआयटीच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. दरम्यान, कॉम्रेड पानसरेंच्या मारेकऱ्यांसंदर्भात कोणतीही माहिती देणाऱ्याला राज्य सरकारने २५ लाखांचं बक्षीसही जाहीर केलेय. मात्र अजूनही माहिती देण्यात पुढे आलेले नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.