शिर्डीत गुढीपाडव्याची धूम...

मराठी नववर्षारंभ निमित्तानं शिर्डीत साईबाबा मंदिरावरच्या कलशावर गुढी उभारण्यात आली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 28, 2017, 08:06 PM IST
शिर्डीत गुढीपाडव्याची धूम...  title=

शिर्डी : मराठी नववर्षारंभ निमित्तानं शिर्डीत साईबाबा मंदिरावरच्या कलशावर गुढी उभारण्यात आली. 

सकाळी साडे सहा वाजता साईबाबा मंदिराच्या कळसाजवळ साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे  यांनी गुढीची सपत्निक विधीवत पूजा केली. 

यावेळी नवीन पंचांगाचीही विधीवत पूजा केली गेली. गुढीपाडवा निमित्तानं साईबाबांच्या मूर्तीला सोन्याच्या अलंकारासह साखरेच्या गाठींचा खास श्रुंगार करण्यात आला. साईंचं दर्शन घेत नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी, लाखोंच्या संख्येनं साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत.