पुणे : सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्लॅट भाड्याने घेऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 53 लाख रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत दीड कोटी रुपये आहे. हा आरोपी गेल्या सहा महिन्यापासून या पदार्थाची विक्री करीत असल्याचे समोर आले आहे.
विशाल पटेल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो गुजरात रहिवासी आहे. त्याच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा एक साथीदार फरार आहे.