नाशिकमध्ये वर्षातली सर्वात मोठी गारपीट, साचला ६ इंचाचा बर्फाचा थर

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीट झालीय. वडांगळी परिसरात तर गारपीटीनं अक्षरशः कहर केलाय. गारांचा चक्क सहा इंचांचा थर साचलाय.

Updated: Mar 14, 2015, 03:12 PM IST
नाशिकमध्ये वर्षातली सर्वात मोठी गारपीट, साचला ६ इंचाचा बर्फाचा थर title=

नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीट झालीय. वडांगळी परिसरात तर गारपीटीनं अक्षरशः कहर केलाय. गारांचा चक्क सहा इंचांचा थर साचलाय.

गारांसह झालेल्या या पावसामुळे सिन्नरसह चांदवड तालुक्यातल्या बहादुरी, शिवरे, पारेगाव परिसरातल्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. सिन्नर तालुक्यातील देवपूर वडागली गावात रस्ते बर्फाने आच्छादलेले दिसतायत. घरांची छते बर्फाळ झाली आहेत. शेतं पांढरी शुभ्र दिसतायत. वाहने जागच्या जागी उभी ठाकली आहेत. चांदवड तालुक्यातील बहादुरी शिवरे पारेगाव या गावात होत्याचे नव्हेत झाले आहे.


Caption

इगतपुरी तालुक्यातील काही भागात गारपीट झाल्याने वरून राजाने या भागातील शेतकारी उध्वस्त केला आहे. आधीच अवकाळी पावसानं शेतकरी पार उध्वस्त झाला असताना पुन्हा गारपीटीनं शेतकऱ्याला दगा दिलाय... 
 
दरम्यान, मुंबईतही पावसाने चांगलीच हजेरी लावलीय. विजेच्या कडकडाटासह मुंबई आणि उपनगरात पाऊस पडलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.