नवी मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील विघ्न काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी सानपाडा येथे तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल ते वाशी दरम्यान वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना रेलरोको केला.
हार्बर मार्गावर स्लो वाहतूक आहे. त्यात नेहमीच गाड्या लेट असतात. या मार्गावर जुन्याच गाड्या चालविला जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. अजुनही ९ डब्बेच गाड्या धावत आहेत. त्यामुळे प्रवासी वर्गात नाराज व्यक्त होत आहे. गेल्या दोन महिन्यात शिवडी, वडाळा, मसज्जिद, कुर्ला या ठिकाणी काहीना काही घटना घडल्याने रेल्वेची रेवा बिघडली.
आज सानपाडा स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाशी ते पनवेल वाहतूक बंद पडली. त्यामुळे पनवेलवरुन गाड्या न सुटल्याने प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. त्यामुळे येथे गोंधळाचे वातावरण होते. वाहतूक अद्याप सुरळीत न झाल्याने प्रवाशांनी प्रशासनाला लाखोल्या वाहील्या.